माझी आजी म्हणायची
ओवी ही जात्यावर
भीम बनला सावली
कोटी कोटीच्या माथ्यावर
राही लहान्या खोलीत
केला अभ्यास रस्त्यावर
नाही खुर्ची टेबल
कधी बसला पोत्यावर
माझी आजी म्हणायची...
नाही भिमाने ठेवली
कधी सुपारी दातावर
पहा आजचे पुढारी
बसती दारू गुत्त्यावर
माझी आजी म्हणायची...
नाही राहिला विश्वास
आता एकाही नेत्यावर
बेकी करू नका किरण
तुम्हच्या पडेल पथ्यावर
माझी आजी म्हणायची...
माझी आजी म्हणायची
ओवी ही जात्यावर
भीम बनला सावली
कोटी कोटीच्या माथ्यावर
(घरघरते वं जातं माय
पहाटचे पारी
अन् याद मले आली वं बाई
मन गेलं माहेरी
माझी आजी म्हणायची...)
गीत : किरण सोनवणे
No comments:
Post a Comment