Showing posts with label chandnyachi chhaya. Show all posts
Showing posts with label chandnyachi chhaya. Show all posts

Tuesday, 14 February 2017

चांदण्याची छाया कापराची काया

चांदण्याची छाया, कापराची काया
माऊलीची माया होता, माझा भीमराया

चोचीतला चारा, देत होता सारा
आईचा उबारा देत होता सारा ;
भीमाईपरी चिल्यापिल्यांवरी
पंख पांघराया होता, माझा भीमराया

बोलतात सारे, विकासाची भाषा
लोपली निराशा आता लोपली निराशा;
सात कोटी मधी, विकासाच्या आधी
विकासाचा पाया होता, माझा भीमराया

झाले नवे नेते, मलाईचे धनी
वामनच्या मनी येती जुन्या आठवणी;
झुंज दिली खरी, रामकुंडावरी
दगड गोटे खाया होता, माझा भीमराया

--- लोकशाहीर वामनदादा कर्डक