Monday, 28 February 2022

माणसा इथे मी तुझे गीत गावे

माणसा इथे मी तुझे गीत गावे
असे गीत गावे तुझे हित व्हावे

असे तुझे माझे नाते जडावे
तुझ्या संकटाशी इथे मी लढावे IIII

तुझ्या भुकेचे कोडे उलगडावे
तुझे दुःख सारे गळुनी पडावे IIII

एकाने हसावे लाखाने रडावे
असे विश्व आता इथे उरावे IIII

इथे सारे सारे नवे पेरताना
वामनपरी मी तुझे हात व्हावे IIII

माणसा तुझे मी इथे गीत गावे
असे गीत गावे तुझे हित व्हावे...
 
~लोकशाहीर वामनदादा कर्डक

No comments:

Post a Comment