Showing posts with label श्री बुद्धाच्या चरणावरती. Show all posts
Showing posts with label श्री बुद्धाच्या चरणावरती. Show all posts

Sunday, 16 April 2017

विजयादशमी दिनी

श्री बुद्धाच्या चरणावरती, विजयादशमी दिनी
दीक्षा आम्हा दिली भीमाने, मंगल दिन तो जनीं

मूळ गाडण्या विषमतेचे, मार्ग असा वेचला
मानवतेचा अन समतेचा धर्म नवा घेतला
श्री बुद्धाच्या महामंत्राचा, निनादला तो ध्वनी

थोर भाग्य हे दलित जनाचे भीमरत्न लाभले
व्यथा तयाची दूर जाहली, कार्य महा साधले
सोने लुटूनी मांगल्याचे लोक हर्षले मनी

कितीक झाले या अवनीवर, संत मुनी ज्ञानी
करू न शकले आजवरी ते, केले भीमाने झणी
उद्धरली नवकोटी जनता, रूढी मोडुनी जुनी
दीक्षा आम्हा दिली भीमाने, मंगल दिन तो जनीं