कुंभारापरी तू भीमा
समाजाला घडविले
धिक्कारुन गुलामीला
बुद्धाकडे वळविले
बावीस प्रतिज्ञेची
भीमा तू दीक्षा दिली
बुद्धाच्या विचारांची
भीमा तू भिक्षा दिली.
प्रगतीच्या शिखरावरी
आम्हाला चढविले...
जीवन उद्धरले
पाळताना पंचशीला
झोपडीच्या जागी आता
दिसू लागला बंगला.
लाचारी-गरीबीला
तूच दूर पळविले...
दरवाजे केले खुले
शिक्षणाच्या भवनाचे
दूध आम्हा पाजियले
गुरगुरत्या वाघिणीचे.
तुझ्या कष्टापायी भीमा
खूप काही मिळविले...
बुद्धाच्या धम्माने
केली लई नवलाई
धम्माकडे वळले
भीमा तुझे अनुयायी.
सर्व पोटजातीला
अमृताने जुळविले...
सप्रेम जयभीम🙏 खूपच चांगला उपक्रम. इंटरनेटवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची गाणी पाहल्यावर खूप गर्व वाटतो सर, तुमच्या या महान कार्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा !जयभीम💐💐💐👏👏👏👏🙏
ReplyDeleteरथ समतेचा असा आणीला सांभाळून न्या हो हे गीता कृपया समाविष्ट करा
ReplyDelete