Sunday, 20 May 2018

माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का

सुज्ञानाचा निर्मळ झरा
भीमासारखा माणूस खरा
जन्मा येईल का
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का
असा पुढारी होईल का 
सांगा पुढारी होईल का 

मानापानाला कधीच नाही चुकून हपापणारा
धनराशीला पाहून कधी कर्तव्य ना चुकणारा
वादळातली समाज नौका किनारी लावील का
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का

करुणेचा सागर होऊन करुणेने कळवळणारा
दीनदलितांसाठी दिन रात्री तळमळणारा
भीमासारखा कर्तृत्वाचा पहाड होईल का
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का

देशविदेशी जनता ज्ञान बघून चकित होई
अशी भीमाची करणी तिला जगात मोलच नाही
अशीच गोधन दीनदलितांची ओझी वाहील का
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का

Lyrics: 
गोधन सावंत 
Singer: मिलींद शिंदे 

11 comments:

  1. खूपच सुंदर गाणे आणि शब्द पण अप्रतिम

    ReplyDelete
  2. अप्रतिम गीत संग्रह

    ReplyDelete
  3. Khu खूप छान👌👌🙏🙏

    ReplyDelete
    Replies
    1. Jay Bhim 💙🙏🏻☺️

      Delete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. Rudayala sparsh honar song ahe he...

    ReplyDelete
  6. Jay Bhim 💙🙏🏻☺️

    ReplyDelete
  7. Shailesh Gulabrao Deore29 September 2025 at 08:15

    Nice खूप छान, बाबासाहेबांचा इतिहास आठवला की अक्षरशः डोळ्यात पाणी येते की त्याकाळी मनुवाद्यान्च्या विरुद्ध लढाई लढणं म्हणजे सोपं नव्हते आणि त्यांची आठवण मिलिंद शिंदे साहेब यांच्या आवाजात ऐकलं की अंगावर अक्षरशः शहारे येतात. आणि असं वाटतं की त्यांचा आवाज ऐकतच राहावं. तुम्हांस मानाचा कोटी कोटी जयभीम

    ReplyDelete