भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना
दुमदुमे 'जयभीम' ची, गर्जना चोहीकडे
सारखा जावे तिथे, हा तुझा डंका झडे
घे, आता घे राहिलेल्या संगरांची वंदना
कोणते आकाश हे, तू अम्हा नेले कुठे,
तू दिलेले पंख हे, पिंजरे गेले कुठे
या भरा-या आमुच्या, ही पाखरांची वंदना
कालचे सारे मुके, आज बोलू लागले
अन तुझ्या सत्यासवे, शब्द तोलू लागले
घे वसंता, घे मनांच्या मोहरांची वंदना
जाळले गेलो तरी, सोडले नाही तुला
कापले गेलो तरी, तोडले नाही तुला
ही तुला उध्वस्त झालेल्या घरांची वंदना
तू उभा सूर्यापरी, राहिली कोठे निशा
एवढे आम्हा कळे, ही तुझी आहे दिशा
मायबापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना
धम्मचक्राची तुझ्या, वाढवू आम्ही गती
हा तुझा झेंडा आम्ही, घेतलेला सोबती
ऐक येणा-या युगांच्या आदरांची वंदना
---सुरेश भट
गीतमाला : प्रेरक, वैचारिक, लोकप्रिय बुद्ध-गीते व भीम-गीतांच्या शब्दरचना आणि समाज क्रांतिकारकांवरील गीतांच्या शब्दरचना एकत्र करण्याचा हा एक प्रयत्न. या गीतांबद्दलची अधिक माहिती व संबंधित सूचनांचे स्वागत आहे. Collection of inspirational, informative, educative and popular compositions on Buddha, Dr. Babasaheb Ambedkar and Great Social Revolutionaries of India. Related information and suggestions about these songs are most welcome. Thanks. (Copyrights belong to respective owners)
Post kelyabaddal khup khup abhaar. Hi Kavita shodhnyacha khup prayatna kela shevti ithe spadli.
ReplyDeleteJai Bhim
Very nice
ReplyDeleteJay bhim dhanyvaad khup manmohak geet aahet Sari
ReplyDeleteजय भीम
ReplyDeleteजय भीम.... हृदयस्पर्शी गीत.... अंगावर काटा आल्या शिवाय राहत नाही... 💐💐🙏🙏
ReplyDeleteNice song it gives energy every time
ReplyDeleteEverytime I listen I get motivated. Thank you very much....
ReplyDeleteमाझ आवडत गाणं आहे. खूप चांगला प्रयत्न केला आहे. अशाच काही नवीन गाण्यांसाठी इथे एकदा भेट देऊ शकता. https://lyricsongsmarathi.blogspot.com/search/label/Bhim%20song
ReplyDeleteसंगीतकार कोण आहेत या गीताचे। ,,गायक रवींद्र साठे आहेत
ReplyDeleteयशवंत देव
Deleteसंगीतकार कोण आहेत या गीताचे। ,,गायक रवींद्र साठे आहेत
ReplyDeleteसंगीतकार कोण आहेत या गीताचे। ,,गायक रवींद्र साठे आहेत
ReplyDeleteयशवंत देव
Deleteयशवंत देव
ReplyDeletesupper
ReplyDeletethanks
ReplyDeleteGreat Song
ReplyDeleteलहापणापासूनच ऐकत आलेली ही गाणी, चळवळीतील बालसंस्कार या अशा उर्जादायी गीतांनी झालीत त्यामुळं बाबासाहेब , बुद्ध आणि धम्माशी नातं घट्ट होत गेलं....
ReplyDeleteBhimraya
ReplyDelete