Wednesday, 24 May 2017

भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना

भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना

दुमदुमे 'जयभीम' ची, गर्जना चोहीकडे
सारखा जावे तिथे, हा तुझा डंका झडे
घे, आता घे राहिलेल्या संगरांची वंदना

कोणते आकाश हे,  तू अम्हा नेले कुठे,
तू दिलेले पंख हे, पिंजरे गेले कुठे
या भरा-या आमुच्या,  ही पाखरांची वंदना 

कालचे सारे मुके, आज बोलू लागले
अन तुझ्या सत्यासवे, शब्द तोलू लागले
घे वसंता, घे मनांच्या मोहरांची वंदना

जाळले गेलो तरी, सोडले नाही तुला
कापले गेलो तरी, तोडले नाही तुला
ही तुला उध्वस्त झालेल्या घरांची वंदना

तू उभा सूर्यापरी, राहिली कोठे निशा
एवढे म्हा कळे, ही तुझी आहे दिशा
मायबापा  घे उद्याच्या अंकुरांची वंदना

धम्मचक्राची तुझ्या, वाढवू आम्ही गती
हा तुझा झेंडा आम्ही, घेतलेला सोबती
ऐक येणा-या युगांच्या आदरांची वंदना

---सुरेश भट 

19 comments:

  1. Post kelyabaddal khup khup abhaar. Hi Kavita shodhnyacha khup prayatna kela shevti ithe spadli.

    Jai Bhim

    ReplyDelete
  2. Jay bhim dhanyvaad khup manmohak geet aahet Sari

    ReplyDelete
  3. जय भीम.... हृदयस्पर्शी गीत.... अंगावर काटा आल्या शिवाय राहत नाही... 💐💐🙏🙏

    ReplyDelete
  4. Nice song it gives energy every time

    ReplyDelete
  5. Everytime I listen I get motivated. Thank you very much....

    ReplyDelete
  6. माझ आवडत गाणं आहे. खूप चांगला प्रयत्न केला आहे. अशाच काही नवीन गाण्यांसाठी इथे एकदा भेट देऊ शकता. https://lyricsongsmarathi.blogspot.com/search/label/Bhim%20song

    ReplyDelete
  7. संगीतकार कोण आहेत या गीताचे। ,,गायक रवींद्र साठे आहेत

    ReplyDelete
  8. संगीतकार कोण आहेत या गीताचे। ,,गायक रवींद्र साठे आहेत

    ReplyDelete
  9. संगीतकार कोण आहेत या गीताचे। ,,गायक रवींद्र साठे आहेत

    ReplyDelete
  10. यशवंत देव

    ReplyDelete
  11. लहापणापासूनच ऐकत आलेली ही गाणी, चळवळीतील बालसंस्कार या अशा उर्जादायी गीतांनी झालीत त्यामुळं बाबासाहेब , बुद्ध आणि धम्माशी नातं घट्ट होत गेलं....

    ReplyDelete