Sunday, 19 February 2017

भीमरायाचा मळा

लयास गेली युगायुगाची हीन दीन अवकळा
पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा

रानमाळ असता भीमाने देह इथे झिजविला
शिंपडून रक्ताचं पाणी शिवार हा भिजविला
बहरली कणसं इमानी माणसं
नाचतो जोंधळा
पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा

त्रिसरणाची झडप तयाला कुंपण पंचशीला
बुद्धं सरणं मार्ग एक हा जाण्यासाठी भला
फिटते भ्रांती मिळते शांती
फुलते जीवनकळा
पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा

बोधिवृक्ष हे डुलती कैसे बांधाबांधावरी
गोड लागते साऊलीत या जीवनाची भाकरी
मळा हा राखू फळे हि चाखू
झरा बाजूला निळा
पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा

कोल्हेकुई हि कुपाकुपानं चाले बाहेरून
दुहीचा कुंदा वरती डोके काढितो आतून
हरेन्द्रासंग धरूया दोघं
हाती एकीचा विळा
पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा

4 comments:

  1. कोल्हेकुई हि कुपाकुपानं चाले बाहेरून
    दुहीचा kunda वरती डोके काढितो आतून

    kunda हा शब्द आहे तिथे काहीतरी गडबड आहे सेटिंग मध्ये अप्रूव्ह होत नाहीये

    ReplyDelete
  2. Thank you, Milind Dhumale Sir.
    कुंदा शब्द घेऊन ओळ पूर्ण करीत आहे.
    आभार.

    ReplyDelete
  3. Bu.haredra jadhav yanchi lekhani aahe salam tyanna

    ReplyDelete