तुझाच गौतमा पडे प्रकाश अंतरी
तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी
बुद्धं सरणं गच्छामी
कळ्या कळ्या फुले फुले तुला पुकारती
पहा तुझीच चालली नभात आरती
तुला दिशा निहारती यशोधरेपरी
तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी
तुझ्यामुळेच जाहला अखेर फैसला
दिलास धीर तोडल्या आम्हीच शृंखला
आता भविष्य आमुचे असे तुझ्या करी
तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी
तुलाच दुःख आमुचे तथागता कळे
तुझीच सांत्वना अम्हा क्षणोक्षणी मिळे
निनाद पंचशीलचा घुमे घरोघरी
तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी
तुझ्यामुळेच मार्ग हा आम्हास लाभला
तुझ्यामुळेच सूर्यही पुन्हा प्रकाशला
तुझेच सत्य यापुढे लढेल संगरी
तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी
तुझ्यासमान एकही नसे तुझ्याविना
सदैव यापुढे करू तुझीच वंदना
भरेल अमृतापरी तुझीच वैखरी
तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी
तुझाच गौतमा पडे प्रकाश अंतरी
तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी
बुद्धं सरणं गच्छामी
गीतमाला : प्रेरक, वैचारिक, लोकप्रिय बुद्ध-गीते व भीम-गीतांच्या शब्दरचना आणि समाज क्रांतिकारकांवरील गीतांच्या शब्दरचना एकत्र करण्याचा हा एक प्रयत्न. या गीतांबद्दलची अधिक माहिती व संबंधित सूचनांचे स्वागत आहे. Collection of inspirational, informative, educative and popular compositions on Buddha, Dr. Babasaheb Ambedkar and Great Social Revolutionaries of India. Related information and suggestions about these songs are most welcome. Thanks. (Copyrights belong to respective owners)
अतुल्य शब्द रचना !
ReplyDeleteकृपया सुरेश वाडकर यांच्या आवाजात रेकॉर्ड केलेले हे गीत पाठवा
ReplyDeleteरविंद्र साठे गीतकार सुरेश भट व संगितकार यशवंत देव यांचे आहे.
Deleteमूळ गीत रवींद्र साठे यांच्या स्वरात आहे
Deleteखुप छान गीत आहे.
ReplyDelete