Sunday, 25 February 2018

Pass It On

(For Dhamma Sharing)
Lyrics: Daniel Yeo
Music: Imee Ooi
*********************************************
There is a gift from Lord Buddha
I like to share with my family
Share it with my friends
and take it round the world
and share it with all beings
Pass it on, pass it on
Let the Buddha’s wisdom stay on
Pass it on, pass it on
Let the Buddha’s love spread on
Pass it on, pass it on
Let the Buddha’s compassion flow on
Pass it on, pass it on
Let the Buddha’s Teaching goes on and on
*********************************************


Monday, 9 October 2017

भीमरावांनी देशावरती प्रेम अलौकिक केले

भीमरावांनी देशावरती प्रेम अलौकिक केले
इतिहासाचे पान सुवर्णी रंगवून ते गेले

गोलमेज ही परिषद हि त्यांनी वाणीने गाजविली
मूलभूत हक्कांची सदनी कैफियत मांडिली
बहिष्कृतांचे दुःख जगाच्या वेशीवर ठेवियले
इतिहासाचे पान सुवर्णी रंगवून ते गेले

प्रतिगामी शक्तींना त्यांनी कडवा विरोध केला
शांतिपथावर रथ क्रांतीचा हाकीत पुढती नेला
तळागाळातील दबलेल्याना पंखगती ती दिधली
इतिहासाचे पान सुवर्णी रंगवून ते गेले

अर्थव्यवस्था या देशाची सुस्थिर भक्कम व्हावी
दारिद्र्याच्या रेषेखालील जनता वरती यावी
स्वप्न गोजिरे भारतभू चे लोचनात रेखियले
इतिहासाचे पान सुवर्णी रंगवून ते गेले

गायक : सुहासिनी, सुरेश वाडकर

सद्धम्म दिधला या जगा

सद्धम्म दिधला या जगा, ही थोर ज्याची योग्यता 
त्या गौतमाची ही कथा 
त्या गौतमाची ही कथा 

लक्ष्मी जिथे पाणी भरी, त्या वैभवी तो वाढला 
ना पुत्र आणि पत्नीच्या, मोहात कधीही वेढला
व्याकुळला तो पाहुनी, विश्वामधील व्याधी व्यथा 
त्या गौतमाची ही कथा 
त्या गौतमाची ही कथा 

ऐश्वर्य सारे त्यागुनी, मारासवे तो झुंजला 
सत्यास जाणुनी शेवटी, निर्वाण पदी तो पावला 
ते ज्ञान देण्या मानवा, जलदापरी द्रवला स्वतः 
त्या गौतमाची ही कथा 
त्या गौतमाची ही कथा 

शांतीचा ध्यास मनी धरला

शांतीचा ध्यास मनी धरला, बुद्ध जगी वंदनीय ठरला 

बोधीवृक्षाच्या छायेत, 
ध्यान लावुनिया एकांत 
मनाचा मेरू सावरला
शांतीचा ध्यास मनी धरला, बुद्ध जगी वंदनीय ठरला 

बुद्धीला होताचि जाण 
केली मग शांती परिधान 
अखेरी मारच तो हरला
शांतीचा ध्यास मनी धरला, बुद्ध जगी वंदनीय ठरला 

शोधिता मानवी कल्याण 
अंती परिणाम तो जाणून 
अंतरी त्यागच तो भरला 
शांतीचा ध्यास मनी धरला, बुद्ध जगी वंदनीय ठरला 

करुणा दया क्षमा शांती 
हीच हो बुद्धाची क्रांती 
मार्ग बहुतांनी अनुसरला
शांतीचा ध्यास मनी धरला, बुद्ध जगी वंदनीय ठरला 


भीमा तुम्हा वंदना

भीमा तुम्हा वंदना
द्यावी सुबुद्धी आम्हा अजाणा

तनमन अमुचे चरणी अर्पण
भावपूर्वक धम्म समर्पण
मंगलमय बुद्धाचे दर्शन
घडविले रामजीनंदना

ना डगमगले कधी संकटी
रान उठविले उपाशीपोटी
लढले झिजले न्यायासाठी
लाजविले गंधित चंदना

चंद्र-सूर्य तळपती जोवर
कीर्ती भूवर राहील तोवर
नवकोटीचा वीर धुरंधर
तोडियले सहजी बंधना

गायक : कृष्णा शिंदे