पंचशीला त्रिशरण हि तत्त्वे दिधली या बहुजना
बुद्धं सरणं म्हणा म्हणा रे, बुद्धं सरणं म्हणा
बुद्धं सरणं गच्छामि
धम्मं सरणं गच्छामि
संघं सरणं गच्छामि
पंचशीलाची पंचतत्त्वे हि मार्ग दाविती भला
सत्य अहिंसा आणि शांतीच्या छायेत राहू चला
खोटे बोलणे चोरी करणे छंद नसे चांगला
सकलासाठी तथागताने हा उपदेश दिला
कुणीही यावे पावन व्हावे निर्मळ करुनी मना
बुद्धं सरणं म्हणा म्हणा रे, बुद्धं सरणं म्हणा
भेदभावाची चिता पेटवून समतेने नांदूया
हितकारक ही तत्त्वे सारी आचरणी आणूया
त्यजूनी वाईट व्यसने आपण सौख्याला साधूया
आदर्शाचे जीवन अपुले जगताला दावूया
उच्च असो की नीच असो हा दोष न द्यावा कुणा
बुद्धं सरणं म्हणा म्हणा रे, बुद्धं सरणं म्हणा
समानता अन मानवताही श्रद्धेने आचरा
दुःखी जीवांचे दुःख हरावे मर्म हे ध्यानी धरा
नीती शील अन प्रज्ञा करुणा नेमाने अनुसरा
बुद्धाची ही शिकवण तुम्हा पालन याचे करा
माणूस म्हणुनी जगण्यासाठी हीच दिली प्रेरणा
बुद्धं सरणं म्हणा म्हणा रे, बुद्धं सरणं म्हणा
गीतमाला : प्रेरक, वैचारिक, लोकप्रिय बुद्ध-गीते व भीम-गीतांच्या शब्दरचना आणि समाज क्रांतिकारकांवरील गीतांच्या शब्दरचना एकत्र करण्याचा हा एक प्रयत्न. या गीतांबद्दलची अधिक माहिती व संबंधित सूचनांचे स्वागत आहे. Collection of inspirational, informative, educative and popular compositions on Buddha, Dr. Babasaheb Ambedkar and Great Social Revolutionaries of India. Related information and suggestions about these songs are most welcome. Thanks. (Copyrights belong to respective owners)
Thursday, 9 March 2017
गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्-बुध्दस्स
गौतम बुद्धाचा, बुद्धाचा संदेश सांगू चला रे
बोध ज्ञानाचा, ज्ञानाचा देऊ चला रे
दुःख पापे जिथे, ऐसा नदीचा किनारा
मोह माया जिथे, ऐसा हा जीवन पसारा
शुद्ध देहाच्या क्षमतेची धारा
प्रज्ञा करुणेच्या ममतेची धारा
विश्व शांतीच्या समतेची धारा
बोध सत्याचा, सत्याचा घेऊ चला रे
गौतम बुद्धाचा, बुद्धाचा संदेश सांगू चला रे
क्रोध युद्धातूनी काही जगी ना उरावे
बंधू प्रेमातूनी सारे हे जीवन तरावे
पंचशीलाच्या शब्दाची गाथा
बोध शुद्धीच्या तत्त्वाची गाथा
बौद्ध धम्माच्या संघाची गाथा
दिव्य मार्गाने, मार्गाने जाऊ चला रे
गौतम बुद्धाचा, बुद्धाचा संदेश सांगू चला रे
जीव त्यागातले श्रद्धेने विश्वात तरती
अहं ईर्षातले पापाच्या खाईत बुडती
हितशत्रुला प्रेमाने जिंका
लोभ मोहाला त्यागाने जिंका
द्वेष क्रोधा संयमाने जिंका
महिमा धम्माचा, धम्माचा गाऊ चला रे
गौतम बुद्धाचा, बुद्धाचा संदेश सांगू चला रे
गौतम बुद्धाचा, बुद्धाचा संदेश सांगू चला रे
बोध ज्ञानाचा, ज्ञानाचा देऊ चला रे
दुःख पापे जिथे, ऐसा नदीचा किनारा
मोह माया जिथे, ऐसा हा जीवन पसारा
शुद्ध देहाच्या क्षमतेची धारा
प्रज्ञा करुणेच्या ममतेची धारा
विश्व शांतीच्या समतेची धारा
बोध सत्याचा, सत्याचा घेऊ चला रे
गौतम बुद्धाचा, बुद्धाचा संदेश सांगू चला रे
क्रोध युद्धातूनी काही जगी ना उरावे
बंधू प्रेमातूनी सारे हे जीवन तरावे
पंचशीलाच्या शब्दाची गाथा
बोध शुद्धीच्या तत्त्वाची गाथा
बौद्ध धम्माच्या संघाची गाथा
दिव्य मार्गाने, मार्गाने जाऊ चला रे
गौतम बुद्धाचा, बुद्धाचा संदेश सांगू चला रे
जीव त्यागातले श्रद्धेने विश्वात तरती
अहं ईर्षातले पापाच्या खाईत बुडती
हितशत्रुला प्रेमाने जिंका
लोभ मोहाला त्यागाने जिंका
द्वेष क्रोधा संयमाने जिंका
महिमा धम्माचा, धम्माचा गाऊ चला रे
गौतम बुद्धाचा, बुद्धाचा संदेश सांगू चला रे
बलिदानाचे कफन बांधुनी
बलिदानाचे कफन
बांधुनी झिजला तू भीमराया
मायपित्याहून
उदंड केलीस अमुच्यावरती माया
अन्यायाची चीड
घेऊनी पेटवली तू धूळ
धुळीतून त्या
तयार झाले लाख लाख हे लाल
अन्यायाच्या पुढे
कधी ना झुकेल त्याची छाया
बलिदानाचे कफन बांधुनी झिजला तू
भीमराया
लाख जीवांच्या
धगधगणाऱ्या घेऊन सवे मशाली
जुन्या रूढींशी
मांडलीस तू जन्ममृत्यूची खेळी
लाचारीतून
दलितांची ना जगेल आता काया
बलिदानाचे कफन बांधुनी झिजला तू भीमराया
बहुजन हिताय
बहुजन सुखाय तू सम्यक दृष्टीचा
तथागतांचा
अनुयायी तू पुत्र जरी क्रांतीचा
येशील का रे
पुन्हा कधी तू आम्हास दर्शन द्याया
बलिदानाचे कफन बांधुनी झिजला तू
भीमराया
Wednesday, 8 March 2017
दलितांच्या दीपा प्रणाम तुज विश्वाचे
तू अमर तेज तव अखंड सामर्थ्याचे
दलितांच्या दीपा प्रणाम तुज विश्वाचे
तू होऊनि जीवन पतितांचे विश्रामा
चिखलात फुलविली सहस्त्र कमळे भीमा
सर्वस्व वाहुनी दलितांच्या उद्धारा
तू पावन तेजा उज्ज्वल केले नामा
तू जीवन दिधले मातीला गंधाचे
दलितांच्या दीपा प्रणाम तुज विश्वाचे
सत्याग्रह करुनी जागविले जग सारे
चवदार तळ्याची उघडी केली दारे
नित जागृत राहुनी न्याय दिला दलितांना
झुंजला तयास्तव गिळूनि द्वेष निखारे
घन तमी उजळिले लक्ष दीप ज्ञानाचे
दलितांच्या दीपा प्रणाम तुज विश्वाचे
तू अमर तेज तव अखंड सामर्थ्याचे
दलितांच्या दीपा प्रणाम तुज विश्वाचे
दलितांच्या दीपा प्रणाम तुज विश्वाचे
तू होऊनि जीवन पतितांचे विश्रामा
चिखलात फुलविली सहस्त्र कमळे भीमा
सर्वस्व वाहुनी दलितांच्या उद्धारा
तू पावन तेजा उज्ज्वल केले नामा
तू जीवन दिधले मातीला गंधाचे
दलितांच्या दीपा प्रणाम तुज विश्वाचे
सत्याग्रह करुनी जागविले जग सारे
चवदार तळ्याची उघडी केली दारे
नित जागृत राहुनी न्याय दिला दलितांना
झुंजला तयास्तव गिळूनि द्वेष निखारे
घन तमी उजळिले लक्ष दीप ज्ञानाचे
दलितांच्या दीपा प्रणाम तुज विश्वाचे
तू अमर तेज तव अखंड सामर्थ्याचे
दलितांच्या दीपा प्रणाम तुज विश्वाचे
भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे
भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे
सुगंधापरी तव किर्ती दिगंतात वाहे
भक्तिभाव श्रद्धासुमने तुला अर्पिताना
कंठ दाटूनी ये अमुचा पूर लोचनांना
तुझी स्मृती अंतःकरणी दुःख कोरताहे
सुगंधापरी तव किर्ती दिगंतात वाहे
शूद्र म्हणुनी जे जे मानव हीन लेखलेले
तमातून काढून त्या तू प्रकाशित केले
कोटी कोटी जनतेचा तू मार्गदीप आहे
सुगंधापरी तव किर्ती दिगंतात वाहे
चंदनापरी तू झिजूनी कष्ट सोसलेस
ज्ञानसूर्य तूचि अमुचा तूच बोधिवृक्ष
तुझी कथा इतिहासाला साक्षीभूत आहे
सुगंधापरी तव किर्ती दिगंतात वाहे
भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे
सुगंधापरी तव किर्ती दिगंतात वाहे
सुगंधापरी तव किर्ती दिगंतात वाहे
भक्तिभाव श्रद्धासुमने तुला अर्पिताना
कंठ दाटूनी ये अमुचा पूर लोचनांना
तुझी स्मृती अंतःकरणी दुःख कोरताहे
सुगंधापरी तव किर्ती दिगंतात वाहे
शूद्र म्हणुनी जे जे मानव हीन लेखलेले
तमातून काढून त्या तू प्रकाशित केले
कोटी कोटी जनतेचा तू मार्गदीप आहे
सुगंधापरी तव किर्ती दिगंतात वाहे
चंदनापरी तू झिजूनी कष्ट सोसलेस
ज्ञानसूर्य तूचि अमुचा तूच बोधिवृक्ष
तुझी कथा इतिहासाला साक्षीभूत आहे
सुगंधापरी तव किर्ती दिगंतात वाहे
भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे
सुगंधापरी तव किर्ती दिगंतात वाहे
Subscribe to:
Posts (Atom)