Sunday, 23 April 2017

भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते

भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते

वाणीत भीम आहे करणीत भीम असता
वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते

गोळी खुशाल घाला, फाशी खुशाल द्यारे
खोटे इथे खऱ्याचे दुसरेच टोक असते

तत्त्वाची जाण असती बिनडोक लोक नसते
सारे चलन तयांचे ते रोखठोक असते

सद्भाव एकतेचे जर अन्तरात असते
तुटले कुणीच नसते सारेच एक असते

वामन, समान सारे स्वार्थाने अंध नसते
तुझिया नीतीप्रमाणे सारेच नेक असते

भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते

---लोकशाहीर वामनदादा कर्डक

15 comments:

  1. खर आहे तस कोणीच नही

    ReplyDelete
  2. वास्तविकता

    ReplyDelete
  3. Jay bhim salute to waman dada kardak

    ReplyDelete
  4. Jay bhim vaman dadachya kartrutvala

    ReplyDelete
  5. What a wording!!! वाणीत भीम आहे करणीत भीम असता!

    ReplyDelete
  6. आजतागायत ही कविता आजच्या राजकीय नेत्यांना आणि जनतेला खोचक आहे, ही कविता आजही हृदयाला पिळून टाकणारी आहे.

    ReplyDelete
  7. 🙏🙏🙏🙏🙏

    ReplyDelete