Friday, 17 September 2021

धम्मदीप हा मानवतेचा

धम्मदीप हा मानवतेचा जगताची प्रेरणा
महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना
वंदना.... वंदना..... वंदना 

बुद्धं संघं मंत्र महान, बुद्धीवंत होऊया
धम्मं सरणं तंत्र महान, नीतीवंत होऊया
संघं सरणं व्हा बलवंत, प्रबल करू तन-मना
महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना

आकाश अमुचे धरणी अमुची, विश्वची अमुचे सारे
मानवप्राणी समान सारे, सांगत सुटले वारे
प्रेम मैत्री ची बंधुभावना, फुलवी नवजीवना
महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना

मनमयूर थुईथुई नाचे, स्वैरपणे निर्मल
स्वयंप्रकाशित जिणे जगावे, भवतु सब्ब मंगल
नागभूमी ती पावन झाली, स्फुर्ती मिळे कुंदना 
महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना

Friday, 10 September 2021

हे शांतिदूत वंदना सुमन स्वीकार करो

हे शांतिदूत वंदना सुमन स्वीकार करो
जय चंद्र सूर्य हे बुद्ध नमन स्वीकार करो

भगवन, तुम्हीने करुणाका सन्मार्ग दिखाया
प्राणनाश, हिंसासे मानवताको बचाया
शुभ कर्मोंका शीतल चंदन स्वीकार करो
हे शांतिदूत वंदना सुमन स्वीकार करो

हे पंचशील का पंचामृत बरसाने वाले,
भगवन,
हे पवित्रताकी पावन ज्योति जगाने वाले
मनप्राणोंका निर्मल गुंजन स्वीकार करो
हे शांतिदूत वंदना सुमन स्वीकार करो

हे ज्ञानसूर्य करुणासागर ज्योतिर्मय गौतम
मानवतारक्षक दिव्य बुद्ध मंगलमय गौतम
ये तन ये मन जीवन कणकण स्वीकार करो
हे शांतिदूत वंदना सुमन स्वीकार करो

Sunday, 6 June 2021

पंचशीलाची तत्त्वप्रणाली

पंचशीलाची तत्त्वप्रणाली विश्व जीवनोद्धार
अनुसरा बुद्धाचे सुविचार
पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि ||
जीवहिंसेपासुनी अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करितो 
दया क्षमा शांती प्रेमाने
मानवसेवा नित्य मी करितो
त्यजुनि अत्याचार
अनुसरा बुद्धाचे सुविचार

अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि ||
चोरी करण्यापासुनी अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करितो
दुर्बुद्धी दुर्गूण त्यजुनी
सद्गुण सुबुद्धी मी आचरितो
जयामुळे उद्धार
अनुसरा बुद्धाचे सुविचार

कामेसुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामी ||
अनाचारापासुनी अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करितो
कामवासना पाप त्यजुनी
भला मार्ग पुण्याचा धरितो
सोडुनिया अविचार
अनुसरा बुद्धाचे सुविचार

मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि ||
खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करितो
सदधम्माचे सत्यवचन
अंगीकारुनी सत्यची वदतो
हाचि घडो आविष्कार
अनुसरा बुद्धाचे सुविचार

सुरामेरयमज्ज पमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि||
मद्यसेवनापासून अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करितो
मादक मोहक जीवननाशक
वस्तूंचा धिःकार मी करतो
करुनिया निर्धार
अनुसरा बुद्धाचे सुविचार

शब्दरचना:
गायक: कृष्णा शिंदे
"दीक्षाभूमी ते चैत्यभूमी"

Thursday, 4 March 2021

रात्र वैर्‍याची आहे

रात्र वैर्‍याची आहे, झोपेतून जाग आता
भिमाच्या सैनिका जपून वाग आता 


किती कष्टाने फुलविली भिमाने ही अमराई
भिमाच्या पाठी आता वाली कोणीही नाही
कशी करपून चालली भिमाची बाग आता
भिमाच्या सैनिका जपून वाग आता

लाचार कुत्र्यापरी गोंडा कोठे घोळू नको
स्वार्थासाठी समाजाशी खेळ खेळू नको
जग तू एक दिवस होऊनि वाघ आता
भिमाच्या सैनिका जपूनि वाग आता

तुपाच्यासाठी वेड्या उष्टे कधी खाऊ नको
संधीसाधूंच्या मागे वेड्या कधी जाऊ नको
नको लावूस तू कुळाला डाग आता
भिमाच्या सैनिका जपून वाग आता

किती नुकसान झालं आपल्यामधल्या बेकीनं
संदीप भटकू नको, रहा आता एकीनं
उरावी किर्ती तुझी, कार्याला जाग आता
भिमाच्या सैनिका जपून वाग आता

Wednesday, 20 January 2021

सागर मनाचा जिथे शुद्ध आहे

सागर मनाचा जिथे शुद्ध आहे
तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे

कुणी माणसाला इथे हीन लेखे
कुणी माणसाला इथे दीन लेखे
तरी समतेसाठी जिथे युद्ध आहे
तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे

महाकाळ आला तरीही पिलांना
पिलांच्या पिलांना, दिलाच्या दिलांना
भीमा माऊलीचे जिथे दुध आहे
तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे

खरी धम्मसेवा, खरी लोकसेवा
मिळे वामनाला तिच्यातून मेवा
जिथे सारी सेवा ही नमूद आहे
तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे

सागर मनाचा जिथे शुद्ध आहे
तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे

~लोकशाहीर वामनदादा कर्डक